मुंबई : दिवंगत अभिनेता सुशात सिंग राजपूत च्या दोन्ही बहिणी विरोधात रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या एफआयआरवर आज न्यायालयात सुनावणी पार पाडली. न्यायालयाने मितू सिंहला दिलासा दिला आहे तर,सुशांतची दुसरी बहिण प्रियांकावरील एफआयआर फेटाळून लावले आहे.
सुशांतला दोन बहिणींनी अवैधरित्या डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन पुरवले आणि त्यातूनच सुशांतविषयी अघटीत घडले असावे, असा आरोप करत रियाने वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर रियाने आम्हाला लक्ष्य करण्यासाठी कुहेतूने एफआयआर नोंदवला, असा दावा करत एफआयआर रद्द करण्याच्या विनंतीची याचिका दोन्ही बहिणींनी कोर्टात केली होती.
वांद्रे पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर रद्द करावा, अशी विनंती करणाऱ्या प्रियांका व मीतू सिंह यांच्या फौजदारी रिट याचिकेवर आज न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने मीतू सिंहविरोधातील एफआयआर रद्द केला आहे. तर प्रियांका सिंहविरोधातील एफआयआर कायम ठेवण्यात आली आहे. रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या आरोपात प्रामुख्याने प्रियांकाविरोधात आरोप आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.