दक्षिणेतील प्रति 'जालीयनवाला बाग'

1 min read

दक्षिणेतील प्रति 'जालीयनवाला बाग'

हैद्राबाद मुक्तीसंग्राम भरात असताना देशप्रेमाने भारलेल्या गोरठेकरांनी रझाकारांना जेरीस आणले.

दक्षिणेतील प्रति 'जालीयनवाला बाग' अशी ओळख असणाऱ्या बिदर जिल्ह्यातील गोरटा बु (ता. हुलसूर) येथील रखडलेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आजपासून तीन दिवसीय उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने हुलसूरकरांनी आंदोलनात सहभाग घेतला.

हैद्राबाद मुक्तीसंग्राम भरात असताना देशप्रेमाने भारलेल्या गोरठेकरांनी रझाकारांना जेरीस आणले. त्यामुळे निझामाच्या चिडलेल्या सैनिकांनी गोरटा (बु) गावावर ५ मे १९४८ रोजी सशस्त्र हल्ला करून २०० अधिक नागरिकांची अमानुष हत्या केली. रझाकर व गावकऱ्यांत दोन आठवड़े संघर्ष चालला होता, अशी नोंद गावातील दगडी स्मारकावर आहे.

हैद्राबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त दि. १७ सप्टेंबर २०१४ रोजी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी गोरटा (बु) येथे हुतात्मा स्मारकाचे भूमीपूजनप्रसंगी लाखो नागरिका समोर गोरटा येथे एका वर्षात भव्य राष्ट्रीय स्मारक व सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्याचे जाहीर केले. पण सदर घटनेस सहा वर्षे पूर्ण होऊनही अद्याप स्मारक न झाल्याने गावकऱ्यांच्या वतीने विश्व क्रांती संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश रोट्टे यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवस १५,१६ व १७ सप्टेंबर असे तीन दिवसीय धरणे आंदोलन व उपोषण करण्यात येत आहे....!