कोरोना चाचणीः खाजगी लॅबला राज्य सरकारचा दणका

1 min read

कोरोना चाचणीः खाजगी लॅबला राज्य सरकारचा दणका

कोरोना चाचणी दरात 50 टक्क्यांची कपात

स्वप्नील कुमावत/मुंबईः आयसीएमआरने सर्व राज्यांना कोरोना चाचणीचे दर निश्र्चीत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारनं कोरोना चाचणीच्या शुल्कासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. एकीकडे कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असताना कोरोनाचं निदान करणा-या चाचणीचे दर सर्वसामान्य़ांना परवडत नाहीत.राज्य सरकारने चाचण्याच्या दरात 50 टक्केची कपात केली आहे. यामुळे खाजगी लॅबला आता मोठा दणका बसला आहे.
आयसीएमआरने दिलेल्या निर्देशानंतर कोरोना चाचणीचे दर निश्र्चीत करण्यासाठी एक समिती नेमली होती.
त्यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष असून अन्य तीन सदस्यात आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, जे जे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. डॉ. अमिता जोशी व वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांचा समावेश होता. या समितीनं अहवाल सरकारकडे सूपुर्द केला होता. यावरुन चाचणीचे दर निश्र्चीत करण्यात आले आहे.