'रामसेतू'च्या सेटवर कोरोनाचा विस्फोट

'राम सेतू'च्या सेटवरही ४५ लोकांना करोनाची लागण झाल्याचे

'रामसेतू'च्या सेटवर कोरोनाचा विस्फोट

मुंबईः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. यात आता आनखी एक नाव समोर आले, अभिनेता अक्षय कुमार यालाही कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्याच्या आगमी चित्रपट 'राम सेतू'च्या सेटवरही ४५ लोकांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या चित्रपटासाठी काम करत असलेल्या ४५ ज्यूनिअर आर्टिस्टच्या करोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सेटवर मोठ्या प्रमानात कोरोनाचा विस्फोट झाल्याने चित्रपटाचे शुटिंग थांबवण्यात आले.

अक्षय कुमार आणि निर्माता विक्रम मल्होत्रा यांनी सर्वांचीच करोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. ज्यात अक्षय कुमारसह १०० पैकी ४५ ज्यूनिअर आर्टिस्टच्या करोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. अक्षय कुमार आणि विक्रम मल्होत्रा यांच्या एका निर्णयामुळे अनेक लोक करोना होण्यापासून वाचले. या सर्वान वर उपचार सुरू आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण १३-१४ दिवसांनंतर सुरू करण्यात येईल.

अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण
अभिनेता अक्षय कुमार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने स्वतः ट्टिट करत दिली माहिती

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.