कोरोना गो : पुण्यातील कोविड सेंटर आणि विलगीकरण कक्ष बंद.

1 min read

कोरोना गो : पुण्यातील कोविड सेंटर आणि विलगीकरण कक्ष बंद.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने पुण्यातील 4 कोविड केअर सेंटर आणि 9 विलगीकरण कक्ष बंद करण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे.

पुणे - कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या काळात सुरु केलेल्या कोविड केअर सेंटर आता बंद करण्याची वेळ आली आहे.   रुग्णसंख्या घटल्याने पुणे शहरातील चार कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटल्याने पालिकेने 4 कोविड केअर सेंटर आणि 9 विलगीकरण कक्ष तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे महानगरपालिकेच्यावतीने शहरात 11 कोविड केअर सेंटर आणि 16 विलगीकरण कक्ष चालवले जातात. सध्या पुणे शहरात 1 लाख 55 हजार कोरोनाबधित रुग्ण झाले असले तरी फक्त 11 हजार 746 रुग्ण उपचार घेत आहेत. यातील 60 टक्के रुग्ण हे घरीच उपचार घेत आहे.

पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील11 कोविड केअर सेंटर होती. त्यातील 4 कोविड केअर सेंटर बंद करण्यात आली आहे. तर 16 विलगीकरण कक्षा होती पैकी 9 विलगीकरण कक्ष बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने हा निर्णय घेतला आहे. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.