कोरोना अजून संपला नाही ; मास्क वापरा.

1 min read

कोरोना अजून संपला नाही ; मास्क वापरा.

मास्क न लावणाऱ्या शहरवासियांकडून वसुल केला तब्ब्ल ३५ लाख ८६ हजारांचा दंड.

सुमित दंडुके/औरंगाबाद **: कोरोनाचे प्रमाण जरी कमी झाले असले तरी कोरोना अजून संपला नाहीये ही गोष्ट औरंगाबाद शहरवासी विसरत असल्याचे सध्या दिसत आहे. शहरात मे महिन्यापासून ते २० ओक्टोम्बर पर्यंत विनामास्क फिरणाऱ्या ७ हजार १६८ नागरिकांकडून तब्ब्ल ३५ लाख ८६ हजारांचा दंड वसूल आला आहे. नागरिकांनी हलगर्जी न करता शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे. अन्यथा पुन्हा एकदा याचे गंभीर परिणाम आपल्या सर्वांना भोगावे लागतील असा सावधानतेचा इशारा स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आला आहे.