'कोरोना आपल्या संयमाची परीक्षा घेत आहे'-पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘मन की बात’ मधुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला

'कोरोना आपल्या संयमाची परीक्षा घेत आहे'-पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशावासियांशी 'मन की बात' मधून संवाद साधला. देशात करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे स्थिती चिंतेची बनत चालली आहे. कोरोनाच्या संकटावर त्यांनी भाष्य केले. येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना करोनावरील लस देण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे. करोना संकटाच्या काळात लसीचे महत्त्व आता सर्वांना कळले आहे. यामुळे लसीच्या बाबतीत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून देशवासियांना धीर देण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या विरोधातील लढाई मजबुतीने सुरू आहे. सर्व सेक्टरच्या लोकांनी सल्ले दिले आहेत. राज्य सरकारही आपल्या पातळीवर काम करत आहे, असे ते म्हणाले. कोरोना काळात केवळ तज्ज्ञांचा सल्ला घ्या. फॅमिली डॉक्टर्स किंवा तुमच्या जवळपासच्या डॉक्टर्सचा सल्ला घ्या. कोरोनाविरुद्धची लढाई लढण्यासाठी तज्ज्ञ आणि संशोधकांच्या सल्ल्यांची गरज आहे.

कोरोना संयमाची परीक्षा घेत आहे. आपले अनेक सहकारी, नातेवाईक आपल्याला सोडून गेले आहेत. हा धैर्य आणि संयमाचा क्षण आहे, लसीकरण महत्त्वाचे आहे. पण लसीबाबत नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. खासगी क्षेत्रानेही लसीकरण मोहीमे मध्ये सहभागी व्हावे.खासगी क्षेत्रातील उद्योगांनी आणि कंपन्यांनी आपल्या कर्माचाऱ्यांचे लसीकरण करावे. केंद्र सरकारकडून राज्यांना लसीचा मोफत पुरवठा केला जात आहे. करोनाच्या या संकटात केंद्र सरकार राज्यांना मदत करण्यासाठी आपल्या सर्व शक्तींचा उपयोग करत आहे, राज्य सरकारांकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.