कोरोना काळात केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची साफसफाई

1 min read

कोरोना काळात केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची साफसफाई

मोरया प्रतिष्ठानचा उपक्रम

हिंगोली: कोरोनामुळे राज्यात जवळपास 100 दिवस लॉकडाऊन करण्यात आले सर्व जनजीवन विस्कळित झाले.या लॉकडाऊनच्या काळात महापुरूषांचे पुतळे देखाल अस्वच्छ झाले होते. सध्या कोविड-19 च्या परिस्थितीत स्वछता ठेवणे महत्त्वाचं आहे. तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा फार अस्वछ झाला होता.

अशा स्थितीत मोरया प्रतिष्ठान हिंगोली तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चे स्वछ करण्याची मोहिम हाती घेतली. त्यावेळी उपस्थित सं.अध्यक्ष अभिषेक चौधरी,अध्यक्ष अभिषेक होकर्णे,उपाध्यक्ष यश अग्रवाल,कोषाध्यक्ष संकेत लादनीय,सचिव वरुन पाटील गोरेगावकर,सचिव अर्पित बगडिया, सहसचिव योगेश होकर्णे सहसचिव रौनक नेनवानी,प्रशांतआप्पा सराफ,आकाश डहाळे,अभिषेक अग्रवाल,महेश होकर्णे यांनी याउपक्रमात सहभाग घेत साफसफाई केली.