कोरोना मुळे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन पुढे ढकलले

1 min read

कोरोना मुळे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन पुढे ढकलले

शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांची माहिती

प्रतिनिधी : शेतकरी संघटनेच्या वतीने इस्लामपूर जि. सांगली येथे दि.19 मार्च 2020 ते 23 मार्च 2020 या कालावधी दरम्यान शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन सोबतच बळिराजा कृषा व पशु प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनास मोठ्या प्रमाणात स्टॉल धारकांनी, उद्योजकांनी व शेतक-यांनी सहभाग नोंदणी केली होती. परंतू कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे व पुणे येथे कोरोनाचे 5 रूग्ण आढल्यामुळे प्रदर्शने, मेळावे, अधिवेशने पुढे ढकलण्याच्या सुचना केंद्र व राज्य शासनाने दिल्या आहेत.
खबरदारीचा उपाय म्हणून हे अधिवेशन व प्रदर्शन पुढे ढकलत आहोत व लवकरच शासनाची परवानगी घेऊन कार्यक्रमाची तारीख जाहीर करू असे परिपत्रक शेतकरी संघटनेच्या वतीने काढण्यात आले.