तारक मेहताच्या सेटवर कोरोना !

1 min read

तारक मेहताच्या सेटवर कोरोना !

निर्माते असित कुमार मोदी यांना कोरोनाची लागणं.. शूटिंग मात्र सुरु राहणार

वैष्णवी दंडुके / 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय मालीकेचे निर्माते असित कुमार मोदी यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशी माहिती त्यांनी स्वतः ट्विट करुन चाहत्यांना दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आली आहे म्हणून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. गेल्या दिवसात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहे त्यांनी आपली चाचणी करुन घ्या आणि काळजी घ्या, असही त्यांनी चाहत्यांना सांगितले आहे. यावेळी मलिकेची शूटिंग बंद होणार नसल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
त्यांनी ट्विट करत म्हंटले आहे की,
'जेव्हा मला कोरोनाची लक्षणं जाणवली तेव्हा मी टेस्ट केली. माझी टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी काळजी घ्या आणि प्रोटोकॉलचं पालन करा. माझी काळजी करू नका. तुमचं प्रेम, प्रार्थना आणि आशीर्वादानं मी लवकरच बरा होईल. तुम्ही मस्त आणि निरोगी राहा.'
mm-1