नवी दिल्ली: दिल्ली मध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना पसरण्याच्या भितीने एका अधिका-यांने आत्महत्या केल्याची घटना दिल्ली मध्ये घडली आहे. इंडियन रेव्हेन्यू सर्विस ऑफिसर शिवराज सिंह त्यांचे नाव असून ते आयकर विभागामध्ये अप्पर आयुक्त म्हणून कार्यरत होते.
त्यांनी कारमध्ये अँसिड प्राशन करून जीवन संपवले. त्यांच्या कारमध्ये चिठ्ठी सापडली आहे. त्यात असे लिहले होते. ‘माझ्यापासून कुटूंबाला कोरोनाची लागण होईल ते मी त्यांना देऊ शकत नाही, यामुळे आत्महत्या करत आहे.’
त्यांनी एका आठवड्यापूर्वीच केली होती कोरोना टेस्ट,रिपोर्ट निगेटिव्ह आला होता मात्र तरीही त्यांना भिती वाटत होती त्यांच्यापासून कुटूंबाला कोरोनाची लागण होईल.
शिवराज सिंह
2006 च्या बॅचचे IRS अधिकारी शिवराज सिंह होते. ते द्वारका सेक्टर मध्ये राहत होते त्यांचा ड्यूटी आर के पुरमच्या आयकर विभागात होती. रविवारी सांयकाळी घराच्या बाहेर कार उभी करून अँसिड प्राशन करून आत्महत्या केली. उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये हलविले मात्र त्यांचा मृत्यू झाला.
कोरोना पसरण्याच्या भितीने अधिका-याची आत्महत्या
एका आठवड्यापूर्वीच केली होती कोरोना टेस्ट,रिपोर्ट आला होता निगेटिव्ह

Loading...