घाटीत कोरोना रूग्णाची चौथ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या.

1 min read

घाटीत कोरोना रूग्णाची चौथ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या.

अचानक घडलेल्या याप्रकारामुळे घाटी परिसरात गोंधळ उडाला आहे.

सुमित दंडुके/औरंगाबाद - औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. घाटीत कोरोना विषाणूवर उपचार घेत असलेल्या, एका रुग्णाने आज सकाळी चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हा रुग्ण पैठण इथल्या धनगावचा रहिवासी होता. त्याचं वय ४२ वर्षे होतं, अशी माहिती अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी दिली आहे. अचानक घडलेल्या याप्रकारामुळे घाटी परिसरात गोंधळ उडाला आहे.