कोरोना संशयित रुग्णांना विलगीकरणासाठी हॉटेलांना परवानगी

1 min read

कोरोना संशयित रुग्णांना विलगीकरणासाठी हॉटेलांना परवानगी

मीरा भाईंदर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्तांनी दिली हॉटेलमध्ये विलगीकरण करण्याची परनानगी.

मीरा भाईंदर: मीरा भाईंदर महानगरपालिकेचे क्षेत्रातील १३ खाजगी हॉटेलला संशयीत रूग्णांना विलगीकरणसाठी परवानगी देण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे या १३ हॉटेल मध्ये कोरोना संशयित रुगणांना विलगीकरणासाठी २५०० रुपये प्रतिदिवस अधिक जीएसटी सुद्धा स्वतःच्या खिशातून द्यावी लागणार आहे. मीरा भाईंदर शहरात झपाट्याने कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. कोरोना बधितांची संख्या चार हजारच्या पार झाली आहे. जागेच्या कमतरतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, परंतु सामान्य माणूस गेल्या तीन महिन्यांपासून घरात बसून आहे. त्यात जर त्याला विलगीकरणासाठी प्रतिदिवस २५०० रक्कम द्यावा लागणार आहे. हे पैसे कुठून देणार असा प्रश्न विलगीकरण करणारा रुग्णाना पडला आहे. महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.औरंगाबाद मध्ये देखील अशा हॉटेल्सना परवानगी मिळाल्याची माहिती आहे.

कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीना विलगीकरण केल्या जाते. या विलगीकरणाकरीता आता पर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा महाविद्यालयात विलगीकरण केल्या जात होता. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिरा भाईंदर महानगरपलिकेच्य नवनियुक्त आयुक्तांनी खाजगी हॉटेला परवानगी दिली आहे. यावर जिल्हातील विरोधक त्याच्यावर टिका करत आहे. मागील 3 महिन्यापासून असलेल्या लॉकडाऊन मुळे लोकांकडे पैसे नाही. आशातच विलगीकरणात राहण्याची गरज पडल्यास २५०० रु प्रतीदिवस कुठून देयाचे हा प्रश्न पडला आहे.