कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी-आरोग्यमंत्री राजेश टोपे

1 min read

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी-आरोग्यमंत्री राजेश टोपे

दुसरी लाट आली तरी परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज

सुमित दंडुके : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असली तरी कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे, असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. दुसऱ्या लाटेची शक्यता असली तरी त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारची पूर्ण तयारी असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
युरोपियन देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे तिकडच्या देशांत पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलं आहे. याबाबतच्या बातम्या आपण ऐकतोय. सहाजीकच, आपल्याकडे देखील कोरोनाची दुसरी लाट येईल का ? अशी चर्चा सुरु आहे. मात्र आपल्याकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. तरीदेखील राज्य सरकार यासाठी पूर्ण तयार आहे. दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असली तरी नागरिकांनी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. सरकारने दिलेले नियम-अटींचे पालन करावे. मास्क वापरणे गरजेचे आहे. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत मास्क आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, असेही टोपे म्हणाले.