CORONA UPDATE: बीड जिल्ह्यात 6 नविन कोरोना रुग्ण

1 min read

CORONA UPDATE: बीड जिल्ह्यात 6 नविन कोरोना रुग्ण

जिल्ह्यातील रुग्णांची 76 वर

बीड:जिल्ह्यात एकुण कोरोनाग्रस्तांची सांख्या 76 वर गेली आहे. आतापर्यंत 56 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 17 रूग्णांवर उपचार सुरु आहेत. 2 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मुंबईहुन आलेल्या एका 35 वर्षीय व्यक्तीचा दोन वेळा स्वॅब घेण्यात आला त्यात दोन्ही वेळा त्याचा अहवाल अनिर्णित राहिला. रविवारी रात्री तिस-यांदा स्वॅब घेतल्यानंतर सोमवारी पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. अहमदनगर वरुन आलेल्या 6 जणांपैकी एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. हा बीड जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला बळी ठरला होता.