CORONA UPDATE : जालना जिल्ह्यात 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

1 min read

CORONA UPDATE : जालना जिल्ह्यात 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

कोरोनाग्रस्तांची संख्या 219 वर, 5 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

स्वप्नील कुमावत/जालना : जालना जिल्ह्यात सोमवारी रात्री 14 संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 219 वर पोहचली आहे. जिल्हा रुग्णालयातर्फे प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आलेल्या एकुण नमुन्या पैकी 72 संशयीत रुग्णांचे अहवाल सोमवारी रात्री जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले असून त्यात 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 68 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 7 रुग्ण बालाजी नगर भागातील असून मोदीखाना भागातील 2, गुडलागल्ली 1, सरस्वती मंदिर 1, बोथल ता जालना 1, सोनपिंपळगाव ता. अंबड 1 असे एकुण 14 नविन कोरोनाग्रस्ता रुग्ण आढळले आहे. एकीकडे 122 रुग्णांना सुट्टी देण्यात आल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच आज सोमवारी रात्री पुन्हा 14 नविन रुग्णांची भर पडल्याने जालना शहर व जिल्ह्यातील जनतेची चिंता वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 5 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.