Corona Update: जालना जिल्ह्यात 13 नविन कोरोना पॉझिटिव्ह

1 min read

Corona Update: जालना जिल्ह्यात 13 नविन कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 267 वर

स्वप्नील कुमावत/जालनाः जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 नविन कोरोना रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 8 कोरोनाबाधितांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा 105 रुग्णांचा अहवाल आला. यातील 12 रुग्ण पॉझिटिव्ह आले. यामुळे जालना जिल्ह्याची कोरोना रुग्णांची संख्या 267 वर गेली आहे. जालना जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे जिल्ह्यावरील कोरोनाचे सावट अधिक गडद झाले आहे. नव्याने पॉझिटिव्ह आढळुन आलेल्या 12 रुग्णांमध्ये जालना राज्य राखीव बल गट (एसआरपीएफ) 4, काद्राबाद परिसर 4 व बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथिल 4 रुग्णांचा समावेश आहे.