कोरोना लस,निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जीची मोठी घोषणा

पश्चिम बंगालच्या जनतेला कोरोनाची लस मोफत दिली जाणार

कोरोना लस,निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जीची मोठी घोषणा

पश्चिम बंगालच्या जनतेला कोरोनाची लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केली. ९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालीझालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत देशभरात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशात कोरोना लसीकरणाची १६ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. सगळ्यात आधी आरोग्य कर्मचारीवर्गाला कोरोनाची लस दिली जाईल. त्यानंतर ५० पेक्षा जास्त वयोगटातील लोकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे.

आगामी कालावधीत पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी केलेली घोषणा महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ९ हजार ९२२ वर पोहोचली आहे. तसेच गेल्या २४ तासांत नव्या ९७८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ५ लाख ५९ हजार ८८६ झाली असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७९ टक्क्यांवर गेले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.