कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे मोजावे लागणार.

1 min read

कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे मोजावे लागणार.

कराड नगरपालिका ठणठणीत, मृत कोरोना रुग्णाचा अंत्यसंस्कार करायचा असेल तर दहनासाठी 5500 आणि दफनविधीसाठी 10 हजार रुपये कराड नगरपालिका आकारणार आहे.

सातारा : कराड नगरपालिकाच्या तिजोरीत पैसे नसल्याने आता कराड नगरपालिका  कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी आता पैसे आकारणार आहे. मृत कोरोना रुग्णाचा अंत्यसंस्कार करायचा असेल तर दहनासाठी 5500 आणि दफनविधीसाठी 10 हजार रुपये कराड नगरपालिका आकारणार आहे. तिजोरीत पैसेच नसल्याने ‘दर ठरवण्या’ची वेळ आली नगरपालिकेवर आल्याचे सांगितले जात आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी नगरपालिकेची आहे. त्यासाठी नगरपालिकेने आतापर्यंत 50 लाख रुपये खर्च केले आहेत. पण यानंतर अंत्यसंस्कार करणे शक्य नसल्याचे नगरपालिका प्रशासनाने सांगितले. त्यामुळे मृतांच्या अंत्यसंस्काराचा खर्च यापुढे त्यांच्या नातेवाईकांनाच उचलावा लागणार आहे. तसा ठरावही नगरपालिकेने मंजूर केल्याची माहिती नगरपालिका गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.

आतापर्यंत कराड तालुक्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 7,986 वर पोहोचला आहे, तर एकूण 276 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कराड शहरात परिस्थिती एवढी गंभीर नसली तरी आतापर्यंत 1489 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 67 जणांचा मृत्यू झाला आहे. “आतापर्यंत नगरपालिकेच्या निधीतूनच मृत कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार केले गेले. पण यानंतर आता कराड पालिका दहनविधिसाठी 5500 तर दफनविधीसाठी 10000 रुपये घेणार आहे”