कोरोना व्हायरसवर मात करणार आयुर्वेदिक औषधा, कोरोनिल लॉच

पतंजलीच्या सर्व शास्त्रज्ञांचे, NIMS यूनिवर्सिटीचे डॉक्टर बलवीर सिंह आणि सर्वांचं टीमच अभिनंदन. आयुर्वेद पुन्हा आपलं गतवैभव मिळवू शकेल, असा विश्वास आहे, यासाठी हे प्रेरक आहे. असे आचार्य बालकृष्ण म्हणाले.

कोरोना व्हायरसवर मात करणार आयुर्वेदिक औषधा, कोरोनिल लॉच

नई दिल्ली: जगभरात कोरोना आजारामुळे हाहकार सुरु आहे. यावर विविध देशांनी औषध मिळाल्याचा दावा केला आहे. यातच योगगुरु बाबा रामदेव यांनी देखील कोरोनावर औषध निर्माण केल्याचा दावा केला होता. आज अखेर बाबा रामदेव यांनी कोरोना व्हायरसवरील आयुर्वेदिक औषध लॉन्च केले. आज झालेल्या पत्रकार परिषदेत योगगुरु रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण यांनी याबाबत घोषणा केली. यावेळी औषधाच्या ट्रायलमध्ये सहभागी शास्त्रज्ञ, डॉक्टर, रिसर्चर उपस्थित होते. कोरोना व्हायरसवर मात करणाऱ्या आयुर्वेदिक औषधाचं नाव कोरोनिल असं आहे.

संपूर्ण वैज्ञानिक डॉक्यूमेंटच्या आधारे श्वासारी वटी, कोरोनिल ही कोरोनावरील एविडेंस बेस असलेलं पहिलं आयुर्वेदिक औषध आहे. पतंजलीच्या मते, हा रिसर्च संयुक्तपणे पतंजली रिसर्च इंस्टीट्यूट (पीआरआय) हरिद्वार, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायस (NIMS), जयपूरने केला आहे. या औषधाची निर्मिती दिव्य फार्मसी, हरिद्वार आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वारकडून केली जात आहे. असे रामदेव बाबांनी सांगितले.

आज पतंजली परिवारासाठी मोठा आनंदाचा दिवस आहे. मानवतेच्या सेवेसाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. ही आनंदाची बातमी सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. पतंजलीच्या सर्व शास्त्रज्ञांचे, NIMS यूनिवर्सिटीचे डॉक्टर बलवीर सिंह आणि सर्वांचं टीमच अभिनंदन. आयुर्वेद पुन्हा आपलं गतवैभव मिळवू शकेल, असा विश्वास आहे, यासाठी हे प्रेरक आहे. असे आचार्य बालकृष्ण म्हणाले.

कोरोनावर औषध सापडलं असल्याचा दावा रामदेव बाबा यांनी 13 जून रोजी केला होता. या औषधानं रुग्ण बरं होण्याचं प्रमाण जवळपास 99.99 टक्के आहे, असा दावा योगगुरु रामदेवबाबांनी केला होता. बाबांच्या दाव्यानुसार त्यांच्याकडे आयुर्वेदिक औषधांच्या संशोधनासाठी 500 वैज्ञानिकांची मोठी टीम कार्यरत आहे. केवळ कोरोनाच नव्हे तर वेगवेगळ्या रोगांवर औषध शोधण्याचं प्रमाण सातत्यानं पतंजली करतेय, असं रामदेव बाबंनी सांगितल होत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.