Aurangabad: कोरोनाचा कहर आज 114 नविन रुग्णांची वाढ, रुग्णसंख्या 2265 वर

1 min read

Aurangabad: कोरोनाचा कहर आज 114 नविन रुग्णांची वाढ, रुग्णसंख्या 2265 वर

औरंगाबादमध्ये आज सर्वाधिक नविन रुग्ण आढळले

स्वप्नील कुमावत/औरंगाबादः जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत जात आहे. आज औरंगाबाद मध्ये सर्वधिक 114 नविन रुग्ण आढळले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 2264 वर गेली आहे. मंगळवारी सकाळी 104 रुग्ण आढळले होते. आजचा रुग्ण वाढीचा आकडा सर्वाधिक असल्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे.
आता पर्यत 116 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आता पर्यत एकूण 1283 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेलो आहे. सध्या 865 कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचार सुरु आहे. आज आढळलेल्या 114 रुग्णापैकी 39 महिला आणि 75 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.