कोरोनाग्रस्त आई बाळाला दुध पाजवू शकते- डब्ल्यूएचओ

1 min read

कोरोनाग्रस्त आई बाळाला दुध पाजवू शकते- डब्ल्यूएचओ

स्वप्नील कुमावत: डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉक्टर टेड्रोस एडहॉनम गीरब्रिएसुस यांनी सांगितले की, कोरोना पॉझिटिव्ह आईने आपल्या बाळाला स्तनपान करण्यापासून दुर ठेवु नये. स्तनपान करण्याचे खुप सारे फायदे आहे. यामुळे बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढते. कोरोनापेक्षा जास्त हाऩिकारक असलेल्या आजारावर बाळासाठी आईचे दुध खुप फायदेशीर ठरते.
बाळांना कोविड-19 या आजाराचा धोका कमी आहे. दुस-या खूप सा-या आजारापासून वाचण्यासाठी आईचे स्तनपान फायदेशीर आहे. जर स्तनपान केले नाही तर बाळाला आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो. सध्याचा पारिस्थीत कोविड-19 च्या संक्रमण झालेल्या किंवा होण्याची भिती असलेल्या आईने आपल्या बाळाला स्तनपान करावे. असा सल्ला डॉक्टर टोड्रोस ने दिला आहे.
डब्ल्यूएचओचे रिप्रोडक्टिव हेल्थ सल्लागार डॉक्टर अंशु बनर्जी यांनी सांगितले की, आतापर्यंत आम्हाला आईच्या दुधात (ब्रेस्टमिल्क) मध्ये कोणताही वायरस आढळला नाही. यामुळे आई पासून बाळाला कोरोना संक्रमण होण्याची कोणतीही जोखिम नाही.