कोरोनाला घाबरु नका, सावध राहा, गर्दी टाळा, कोरोना टाळा

1 min read

कोरोनाला घाबरु नका, सावध राहा, गर्दी टाळा, कोरोना टाळा

कोरोनामुळे भारतात आतापर्यंत तीन व्यक्तींचा मृत्यृ झाला आहे

जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये. यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रात ही कोरोनाने शिरकाव केला असून मुंबईहून पुण्यात आलेल्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली. हे महाराष्ट्रतील पहिले रुग्ण आहेत त्यानंतर त्यांची मुलगी, नातेवाईक आणि नंतर त्यांच्या कुटूंबाला घेऊन जाणा-या टॅक्सी चालकाला कोरोनाची लागण झाली आणि हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव सुरू झाला.कोरोनामुळे भारतात आतापर्यंत तीन व्यक्तींचा मृत्यृ झाला आहे.

फोटो-गुगल साभार
  1. दिल्लीतील एका 68 वर्षीय महिलेची तब्येत बिघडल्याने मृत्यृ झाला आहे. तिचा मुलगा गेल्या महिन्यात इटली आणि स्वित्झर्लड मधून प्रवास करुन आला होता. त्याला कोरोनाची लागण झाली होती त्यापासुन त्याच्या आईला कोरोना झाला आणि तिचा 13 मार्च 2020 रोजी मृत्यृ झाला.
  2. कर्नाटकात एका 76 वर्षीय महिलेचा कोरोना आजारामुळे मृत्यृ झाला ती मागीलकाही दिवसापूर्वी सौदी अरेबिया वरून प्रवास करून परत आली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले होते.तिचा 13 मार्च रोजी मृत्यृ झाला.
  3. महाराष्ट्रातील मुंबईत 17 मार्च रोजी 64 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा या आजाराने मृत्यृ झाला असुन या व्यक्तीला रक्तदाब, मधुमेह यासारखे अन्य आजार होते.कोरोनाचे जगभरात ऐकुण 1लाख 82हजार 820 रुग्ण आढळले.
    यातून 79 हजार 884 रुग्ण बरे झाले आहे. तर 7175 लोकांचा मृत्यृ झाला आहे.

भारतात या व्हायरसची 133 रुग्ण आढळले आहेत. यातुन 13 रुग्ण बरी झाली आहेत. 3 रुग्णाचा मृत्यृ झाला आहे.महाराष्ट्रात या व्हायरसचे देशातील सर्वधिक 39 रुग्ण आढळले आहे तर यातील 10 रुग्ण बरे झाले आहेत तर एका रुग्णाचा मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात मृत्यृ झाला.
यावर उपाय म्हणून सरकारने 31 मार्च पर्यंत शाळा, महाविद्यालये,मॉल बंद केली आहेत गर्दीच्या ठिकाणी लोकानी जाऊ नये. असे अवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुर, शिर्डीसह 20 मोठी मंदिर बंद करण्यात आली आहेत.

कोरोनाला घाबरु नका, सावध राहा, गर्दी टाळा, कोरोना टाळा

  • स्वप्नील कुमावत