कोरोनामुळे हिंगोलीत एकाच दिवशी दोघांचा मृत्यू

1 min read

कोरोनामुळे हिंगोलीत एकाच दिवशी दोघांचा मृत्यू

जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 3 वर

प्रद्युम्न गिरीकर /हिंगोली: हिंगोलीतील  जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात उपचार घेणाऱ्या दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील सेनगाव येथील 54 वर्षे व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे समोर आल्यानंतर त्यास जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. पाठोपाठ सोमवारी हिंगोली शहरातील तोफखाना भागातील 65 वर्षे व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान या दोघांचाही मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यात अद्याप पर्यंत तिघांचा करणामुळे मृत्यू झाला असून जिल्ह्यातील इतर तीन नागरिकांचा जिल्ह्याबाहेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यामध्ये 440 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यापैकी 323 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 114 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. सध्या सात रुग्णांची प्रकृती गंभीर तर दोन रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना कृत्रिम श्वासोश्वास दिल्या जात आहे. गेल्या चोवीस तासात सात नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनासमोर  नवे आव्हान निर्माण झाले असून जिल्ह्यात पुन्हा संचारबंदी लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.