आयसीसीच्या मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव, क्रीडा क्षेत्रावर मोठा परिणाम

1 min read

आयसीसीच्या मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव, क्रीडा क्षेत्रावर मोठा परिणाम

आयसीसी च्या दुबई येथिल मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती आयसीसीच्या एका वरिष्ठ सदस्यांने दिली आहे.

दुबई : आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसीच्या मुख्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आयसीसी च्या दुबई येथील मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती आयसीसीच्या एका वरिष्ठ सदस्यांने दिली आहे. मात्र या सर्व प्रकाराबाबत आयसीसीकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

या कोरोना बाधित कर्मचाऱ्यांना यूएईतील आरोग्य विभागाच्या नियमांनुसार क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तसेच सुरक्षिततेचा उपाय म्हणून काही दिवस आयसीसीचे मुख्यालय बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे आता मुख्यालयातील इतर कर्मचाऱ्यांना काही दिवस आपल्या घरुनच काम करावे लागणार आहे.

आयसीसीच्या मुख्यालयात कोरोनाग्रस्त सापडले. त्यामुळे आता आयपीएल स्पर्धेवर याचा परिणाम होणार का? अशी चर्चा क्रीडा क्षेत्रात पाहायला मिळत आहे. मात्र या घटनेचा आयपीएल स्पर्धेवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. यूएईमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. पण आयपीएल स्पर्धेतील सर्व संघांना दुबईमधील अ‍ॅकेडमी वगळता आयसीसी अॅकेडमीच्या मैदानात सराव करता येणार आहे.