विनामास्क फिरणार्‍यांवर मनपाची कारवाई

३५ हजार २०० रुपयांचा दंड वसुल...

विनामास्क फिरणार्‍यांवर मनपाची कारवाई

परभणी : राज्यासह परभणीतही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. नागरिक तोंडाला मास्क लावत नाहीत, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नाहीत. अशा नागरिकांविरोधात पोलीस प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

मनपा आयुक्त देविदास पवार यांनी यासाठी तीन पथकांची स्थापना केली आहे. बुधवार, २४ फेब्रुवारी रोजी मनपा, महसुल आणि पोलीस प्रशसनाच्या वतीने शहरातील सावली विश्रामगृहाजवळ मास्क न लावणा-या १०७ नागरिकांवर कारवाई केली. यामध्ये २१ हजार ४०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच बाजारपेठेत फिरणा-या ६९ नागरिकांवर १३ हजार ८०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. अशी एकूण ३५ हजार २०० रुपयांची दंडाची रक्कम या पथकाने वसुल केली. पथकामध्ये सावली विश्रामगृहाजवळ डॉ. संजय बिरादार, सहाय्यक आयुक्त श्रीकांत कांबळे, अब्दुल मो. शाबाद, न्यायरत्न घुगे, लक्ष्मण जोगदंड, जय मकरंद, कुणाल भारसाखळे तर बाजारपेठेत सहाय्यक आयुक्त संतोष वाघमारे, विनय ठाकूर, श्रीकांत कु-हा, शे.इस्माईल, शेख रफीक, श्रावण कदम आदींचा या पथकामध्ये समावेश होता.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.