पादचाऱ्यांसाठी मनपाचा ' स्ट्रीट्स फॉर पीपल ' प्रकल्प

1 min read

पादचाऱ्यांसाठी मनपाचा ' स्ट्रीट्स फॉर पीपल ' प्रकल्प

शहरातील रस्त्यांवर लोकांना पायी चालणे सहज व्हावे, या हेतूने औरंगाबाद शहर 'स्ट्रीट्स फॉर पीपल' या राष्ट्रीयस्तर स्पर्धेत सहभागी होत आहे.

सुमित दंडुके / औरंगाबाद.दि.२६ : शहरातील रस्त्यांवर लोकांना पायी चालणे सहज व्हावे, या हेतूने औरंगाबाद शहर 'स्ट्रीट्स फॉर पीपल' या राष्ट्रीयस्तर स्पर्धेत सहभागी होत आहे. शहरातले तीन मुख्य रस्ते, 'कॅनॉट सर्कल, क्रांती चौक ते उस्मानपुरा सर्कल आणि पैठणगेट ते गुलमंडी' या रस्त्यांची निवड या पायलट प्रोजेक्टसाठी करण्यात आली आहे. केंद्रीय शहरी विकास खात्याअंतर्गत द इंडिया स्मार्ट सिटी मिशन यांनी राष्ट्रीय स्तरावर स्ट्रीट्स फॉर पीपल ही स्पर्धा आयोजित केली आहे. या योजनेचा उद्देश शहरातील रस्त्यांचा आर्थिकदृष्ट्या विकास,नागरिकांची सुरक्षा आणि लहान मुलांमुलींसाठी मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करून कोरोना संसर्गातून ग्रीन रिकव्हरी करणे असा आहे.