कोविड सेंटर मध्ये भ्रष्टाचार -अमृता फडणवीस

उद्योगपतींना भीती दाखवून त्यांच्याकडून वसुली करण्याची योजना आपल्याच काही हस्तकांसोबत तयार करत आहेत-अमृता फडणवीस

कोविड सेंटर मध्ये भ्रष्टाचार -अमृता फडणवीस

मुंबईः राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सचिन वाजे प्रकनात महाविकास आघआडीवर जोरडदार टिका केली . उद्योगपतींना भीती दाखवून त्यांच्याकडून वसुली करण्याची योजना आपल्याच काही हस्तकांसोबत तयार करत आहेत. असा आरेप त्यानी सरकार वर केला आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर २५ फेब्रुवारीच्या रात्री स्कॉर्पिओ कार पार्क करण्यात आली होती. या कारमध्ये जिलेटिनच्या १९ कांड्या आढळून आल्या होत्या. या कारचा मालक मनसुख हिरन यांचा काही दिवसांनी अचानक मृत्यू झाला. भाजपच्या नेत्यांनी यात सचिन वाझे यांचा हात असल्याचा आरोप केला. त्यानंतर वाझे यांची मुंबई क्राइम ब्रँचमधून बदली करण्यात आली होती. त्यानंतर हा तपास एनआयएकडे सोपवण्यात आल्यानंतर एनआयएने १२ तासांच्या मॅरथॉन चौकशीनंतर वाझेंना अटक केली होती. वाझेंच्या अटकेनंतर अमृता फडणवीस यांनी सरकारला घेरले आहे. त्यांनी केलेले एक ट्टिट सध्या चर्चेला विषय ठरत आहे.

अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकार कोरवीड सेंटर मध्ये भष्टाचार करत आहे. आसा गभिर आरोप करत त्या एक ट्टिट करत 'एकीकडे नागपूरसारख्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्णांना भरती करण्यासाठी खाटा उपलब्ध नाहीत. तर, दुसरीकडे महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करत आहेत, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. शिवाय, उद्योगपतींना भीती दाखवून त्यांच्याकडून वसुली करण्याची योजना आपल्याच काही हस्तकांसोबत तयार करत आहेत, असा आरेप अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.