कोवीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भातील धोरणाबाबत डॉ. व्ही. के. पॉल समितीचा अहवाल सादर

1 min read

कोवीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भातील धोरणाबाबत डॉ. व्ही. के. पॉल समितीचा अहवाल सादर

कोवीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशानुसार 14 जून 2020 रोजी डॉ. विनोद पॉल यांच्या अध्यातेखाली समिती तयार करण्यात आली होती. तिने आपला अहवाल सादर केला.

नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशानुसार, दिल्लीमधील कोवीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धोरणाबाबत अहवाल तयार करण्यासाठी 14 जून 2020 रोजी डॉ. विनोद पॉल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली 22 जून रोजी झालेल्या बैठकीत आपला अहवाल सादर केला. या बैठकीला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, दिल्लीचे उपराज्यापाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य सचिव आणि दिल्लीचे मुख्य सचिव उपस्थित होते.
डॉ. पॉल यांनी निर्धारित केलेले महत्वपूर्ण मुद्दे :-

  • प्रतिबंधित क्षेत्रांचे नव्याने परिसीमन केले जावे. अशा क्षेत्रांमधील अंतर्गत व्यवहारांवर काटेकोर देखरेख आणि नियंत्रण असावे.
  • आरोग्य सेतू आणि इतिहास अँपच्या माध्यमातून सर्व संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा मागोवा आणि अशा सर्व व्यक्तींचे विलगीकरण करावे.
  • दिल्लीबाबत सर्वसमावेशक माहिती मिळवण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्राबाहेरच्यासुद्धा सर्व घरांची यादी तयार करणे आणि त्यावर देखरेख ठेवावी.
  • कोविड-19 रुग्णांना रुग्णालयात, कोविड देखरेख केंद्रात किंवा घरगुती अलगीकरणात ठेवले जावे. कोविड देखरेख केंद्रांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केले जावे. आणि त्यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच खासगी संस्थांची मदत घेतली जावी.

संपूर्ण दिल्लीमध्ये 27 जून ते 10 जुलै या अवधीत एक सेरोलॉजीकल सर्वेक्षण केले जाणार आहे. ज्यात 20 हजार लोकांच्या चाचण्य केल्या जाणार असून त्यामुळे दिल्लीमधील कोरोना विषाणू संक्रमणाची सर्वसमावेशक माहिती मिळू शकेल आणि त्यामुळे कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक व्यापक धोरण विश्र्चित करणे शक्य होईल. दिल्लीमधील प्रत्येक जिल्हा एका मोठ्या रुग्णालयाशी जोडला जावा, त्यामुळे त्या जिल्ह्यातील रुग्णांना आवश्यक ती मदत मिळू शकेल. अशा योजनेचा प्रस्ताव डॉक्टर पॉल यांनी मांडला.