क्रिकेटपटू एम. सुरेश कुमारची आत्महत्या

राहुल द्रविडच्या नेतृत्वात जबरदस्त कामगिरी करणारा क्रिकेटपटू उंबरी उर्फ एम. सुरेश कुमारने आत्महत्या केली आहे.

क्रिकेटपटू एम. सुरेश कुमारची आत्महत्या

नवी दिल्ली: राहुल द्रविडच्या नेतृत्वात जबरदस्त कामगिरी करणारा क्रिकेटपटू उंबरी उर्फ एम. सुरेश कुमारने आत्महत्या केली आहे. सुरेश कुमारने दि.10 ऑक्टोबर रोजी सकाळी राहत्या घरी आत्महत्या केली. सुरेश कुमारने 1990 मध्ये अंडर-19च्या टीममधून केरळचं प्रतिनिधीत्व केलं होतं. केरळमधून अंडर-19 च्या टीममध्ये खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला होता. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

सुरेश कुमारने आज सकाळी राहत्या घरी आत्महत्या केली. त्याचा मृतदेह घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे पोलिसांना तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिसांनीही पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.

स्पिनर सुरेश कुमारने 1990 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केलं होतं. त्यावेळी राहुल द्रविड अंडर-19 च्या संघाचा कर्णधार होता. त्यावेळी सुरेश कुमार आताचे आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्जचे कोच आणि न्यूझीलंड संघाचे माजी कर्णधार स्टिफन फ्लेमिंग आणि जलदगती गोलंदाज डियोन नॅशच्या विरोधात मैदानात उतरला होता. केरळने 1994-94 मध्ये रणजी करंडक जिंकला होता. तामिळनाडू विरुद्ध झालेल्या या सामन्यातील विजयात सुरेश कुमारचा सिंहाचा वाटा होता. रणजी करंडकमध्ये सुरेशने 164 धावा देऊन 12 बळी घेतले होते. त्यानंतर 1995-96मध्येही रणजी करंडकमध्ये राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने हॅट्रिक केली होती.

सुरेशने झारखंड विरुद्धचा रणजी सामना खेळल्यानंतर 2005 मध्ये क्रिकेट संन्यास घेतला होता. त्यानंतर तो रेल्वेसोबत काम करू लागला. सुरेशने त्याच्या करिअरमध्ये 72 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 196 बळी घेतले होते. या काळात त्याने 51 लिस्ट ए सामन्यातही भाग घेतला होता. त्याच्या कारकिर्दीत त्याने अनेक बड्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.