टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आता बाप होणार आहे, याबद्दल त्याने पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्याने लिहिले, 'आता आम्ही दोन नाही तर तीन असू! 2021 जानेवारीत येत आहे तिसरा पाहुणा. '
अनुष्का शर्मानेही विराटप्रमाणे चाहत्यांसह आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. यानंतर विराट आणि अनुष्का शर्मा यांचे अभिनंदन होत आहे. विराट आणि अनुष्काने डिसेंबर 2017 मध्ये लग्न केले होते.