शहरात गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ..! काय आहे कारण?

1 min read

शहरात गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ..! काय आहे कारण?

कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये पोलीस प्रशासनाने बरेच काम केले आहे. पण आता तक्रारी घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचं दिसत आहे.

सुमित दंडुके /औरंगाबाद : तीन ते चार महिन्यांच्या लॉकडाऊननंतर मागील महिन्यापासून शहरातील उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत. कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये पोलीस प्रशासनाचे बरेच हाल झाले. त्यामुळे आता बऱ्याच पोलीस अधिकारी-कर्मचा-यांनी आराम करण्याला पसंती दिली आहे. ड्युटीवर हजर असलेले काही कर्मचारी कामाला टाळाटाळ करता आहेत. याचाच दुष्परीणाम शहरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.
सध्या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. घरफोडी, दुकानफोडी, दुचाकी चोरी, मोबाईल चोरणे आणि इतर अवैध धंदे हे सर्व गुन्हे शहरात दररोजच घडत आहेत. गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गुन्हे शाखेसह प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे शोध पथक कार्यरत आहे. या पथकातील अधिकारी, कर्मचा-यांना गुन्ह्यांची उकल करणे आणि गुन्हे घडणार नाही यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले जाते. मात्र गुन्हे शाखा ते डी.बी पथकाकडून वर्षभरात विशेष अशी कामगिरी झालेली नाही.
अनेक नागरिकांच्या तक्रारी असतात पोलीसांकडून त्यांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. जोपर्यत पोलीस येणाऱ्या प्रत्येक तक्रारींची गांभीर्याने दखल घेत नाही, रात्रीच्या गस्तीवेळी उशिरा बाहेर पडलेल्या प्रत्येकाची थांबवून चौकशी केली जात नाही, कोणी संशयित आढळल्यास त्यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली जात नाही, रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारांकडून गुन्हे मोठ्या प्रमाणात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांना वेळोवेळी पोलीस ठाण्यात बोलवून समज देणे गरजेचे असते. त्यामुळे जोपर्यत पोलीस तत्परतेने आणि गांभीर्याने कारवाई करीत नाहीत. तोपर्यत या गुन्हेगारीला आळा बसणे शक्य नाही.