रावसाहेब दानवेंच्या टीकेला,गृहमंत्र्यांचे 
भन्नाट उत्तर

1 min read

रावसाहेब दानवेंच्या टीकेला,गृहमंत्र्यांचे भन्नाट उत्तर

अमर, अकबर,अँथनी सरकार-रावसाहेब दानवे

मुंबई : होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथनी !” असा शायराना अंदाजात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या व्यक्तव्यावर प्रतिउत्तर दिले आहे. महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे अमर, अकबर, अँथनी असून ते एकमेकांच्या पायात पाय अडकून पडतील, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती.

रावसाहेब दानवे यांच्या टीकेला अनिल देशमुख यांनी उत्तर देताना म्हटलंय,  “दानवेंच्या म्हणण्यानुसार महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनी आहे,बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो, कारण – होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथनी !”

रावसाहेब दानवे यांनी ‘अमर अकबर अँथनी’ या हिंदी चित्रपटाचा संदर्भ देत महाविकास आघाडीचं हे सरकार म्हणजे अमर, अकबर, अँथनी असून ते एकमेकांच्या पायात पाय अडकून पडतील, अशी टीका केली होती. तसेच महाराष्ट्रातील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार आम्ही पाडणार नाही. ते स्वत:च्याच कर्माने पडतील, असं दानवे म्हणाले होते.