गर्दी जमवत केले लग्न, नवरदेव-नवरीसह चौघांवर गुन्हे दाखल

एमआयडीसी सिडको पोलीसांची कारवाई, परवानगी नसताना कार्यालयात क्षमतेपेक्षा अधिक लोकांच्या उपस्थितीत केले लग्न..

गर्दी जमवत केले लग्न, नवरदेव-नवरीसह चौघांवर गुन्हे दाखल

सुमित दंडुके/औरंगाबाद : शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंगल कार्यालय आणि लग्न समारंभ बंद ठेवण्याचे आदेश असतानाही नारेगावातील गोल्डन हॉल येथे क्षमतेपेक्षा अधिक लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पडल्याने नवरदेव-नवरीसह अन्य चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारेगावातील गोल्डन हॉल येथे गर्दी करत लग्न समारंभ चालू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली, त्यानंतर तात्काळ धाव घेतली असता पोलीस पोहोचले तोपर्यंत लग्न लागले होते. पण मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. त्यामुळे संबंधित कार्यालयाचा मालक कासिम शेख, मॅनेजर फईम शेख, जफर शेख यांच्यासह नवरदेव इमरान पठाण त्याचे वडील अन्सार पठाण, तसेच नवरी शेहनाज शेख तीचे वडील हारुण शेख अश्या एकुण सात जणांवर एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आणि प्रशासनातर्फे वारंवार सांगूनही नागरिक नियमांचे पालन करीत नाही. लग्न समारंभ आणि अश्या कार्यक्रमांमुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करुन नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.