सीआरपीएफ जवानाचा मेहुणीवर अत्याचार

अश्लील चित्रिकरण करुन तीन लाखांची केली मागणी...

सीआरपीएफ जवानाचा मेहुणीवर अत्याचार

औरंगाबाद : सीआरपीएफमध्ये कार्यरत असलेल्या एका जवानाने आपल्या मेव्हणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश बबन गिरी असे आरोपीचे नाव

या विषयी सविस्तर माहिती अशी की, सीआरपीएफमध्ये नोकरीवर असलेला गणेश गिरी हा २०१७ मध्ये मुंबई येथे राहत होता. खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील गणेशची मेहुणी काही कामानिमित्त मुंबई येथे आपल्या बहिणीकडे गेली होती. गणेशने मेहुणी समोर आपल्या पत्नीला मारहाण केली व पत्नी समोर मेहुणीला म्हणाला की, 'तू जर मला शारीरिक संबंध करू दिले नाही तर तुझ्या बहिणीला मारुन टाकीन' असे म्हणून बहिणी समोर शारीरिक संबंध केले. याच दरम्यान गणेशने मेहुणी व पत्नी या दोघांना कळू न देता व्हिडिओ चित्रिकरण केले, बनवलेला व्हिडिओ लोकांच्या मोबाईलवर टाकून देण्याची धमकी देत तीन दिवस शारीरिक संबंध केले. काही दिवसानंतर पीड़ित महिला गल्लेबोरगाव गावाकडे परतली. गणेश गिरीने २०१९ पर्यंत मेहुणीला मुंबई येथे वारंवार बोलावून ७ ते ८ वेळा अत्याचार केला.

यानंतर गणेशने मेहुणीला ऑगस्ट २०२१ या महिन्यात फोन करून, 'तीन लाख रुपये दे नाहीतर तुझे अश्लील व्हिडिओ लोकांना पाठवून तुझी बदनामी करतो', अशी धमकी दिली व दि.३१ ऑगस्ट २०२१ रोजी जयश्री पुरी या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्या अकाउंटवर आपल्या मेहुणीचे काढलेली अश्लील व्हिडिओ क्लीप व फोटोचे स्क्रीनशॉट टाकले. ते स्क्रीनशॉट महिलेने प्रिंट काढून पीडित महिला खुलताबाद पोलिस ठाण्यात हजर झाली व बलात्कारी मेहुण्याच्या विरोधात तक्रार दिली.

दिलेल्या तक्रारीवरून गणेश बबन गिरी याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखला करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, सायबर क्राइमचे पोलीस निरीक्षक निकाळजे, पोलीस नाईक यतीन कुलकर्णी करीत आहेत.

मुंबईत निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारानंतर हत्येचा प्रयत्न
घटनेमुळे मुंबईसह महाराष्ट्रात खळबळ...

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.