स्वच्छता आणि वृक्ष संवर्धनाचे विद्यार्थ्यांवर संस्कार करा, सीईओंच्या सूचना

नागरिकांनी शाळेच्या परिसरात घाण टाकू नये अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

स्वच्छता आणि वृक्ष संवर्धनाचे विद्यार्थ्यांवर संस्कार करा, सीईओंच्या सूचना

परभणी : विद्यार्थी शिक्षकांनी शिकवलेल्या सर्वाधिक गोष्टींचे अनुकरण करतात म्हणून जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर स्वच्छते बरोबर वृक्षसंवर्धनाचे संस्कार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिल्या आहेत.

आज मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी परभणी तालुक्यातील दैठणा येथील शाळेला भेट दिली आणि शाळेतील अस्वच्छता आणि वृक्ष लागवडीतील उदासीनते बाबत शिक्षकांची कानउघाडणी केली.यावेळी टाकसाळे यांनी शाळेत नव्याने प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधला, शाळेच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली. तसेच शाळेत असलेल्या अस्वच्छतेवर तीव्र नाराजी व्यक्त करून शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड आणि स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या.

मार्गदर्शन करतांना शिवानंद टाकसाळे पुढे म्हणाले की, शिक्षकांनी शाळेत मास्कचा नियमित वापर करावा, विद्यार्थी शाळेत येताना पिण्याचे पाणी सोबत घेऊन येतात त्यावेळी झाडाला लागणारे वेगळे पाणी आणण्याचे नियोजन करावे, वृक्ष संवर्धनाची जबाबदारी शाळेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी घेणे गरजेची आहे. वृक्ष लागवड करताना प्रामुख्याने शेवगा, पेरू, आंबा, पिंपळ, वड, जांभूळ अशा वृक्षांची निवड करावी. शाळेतील विद्यार्थ्यांचे गट करून त्यांच्यावर वृक्ष संवर्धनाची जबाबदारी सोपवावी, शिक्षकांनी सुट्टीमध्ये चक्राकार पद्धतीने झाडाचे संगोपन करण्यासाठी जबाबदारीची निश्चिती करावी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देताना परिसर स्वच्छता आणि वृक्ष लागवडीबाबत शिक्षकांनी महत्व पटवून द्यावे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.