संचारबंदीत व्यापारी प्रतिष्ठाणे बंद; रस्त्यांवर मात्र वाहनांची वर्दळ

गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात एक हजाराहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत

संचारबंदीत व्यापारी प्रतिष्ठाणे बंद; रस्त्यांवर मात्र वाहनांची वर्दळ

परभणी : गेल्या काही दिवसांपासुन कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसुन येत आहेत. यासाठी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी ७ दिवसांची संचारबंदी जाहीर केली आहे. संचारबंदीच्या पहिल्या दिवशी व्यापारी प्रतिष्ठाणे सर्वत्र बंद होती तर रस्त्यांवर मात्र वाहनांची वर्दळ सर्रासपणे दिसुन येत होती.

विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल सायंकाळपासून अत्यावश्यक सेवांना वगळत संपूर्ण संचारबंदी लागू केली आहे. पहिल्याच दिवशी आज सकाळपासूनच व्यापार्‍यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवली. मात्र, रस्त्यावर रहदारी काही प्रमाणात सुरू असल्याचे दिसून आले.

दरम्यान, गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात एक हजाराहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. बाधितांच्या मृत्यूची संख्येतही मागील दोन-तीन मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर परिस्थिती गंभीर बनत असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संचारबंदीचा निर्णय लागू केला आहे. गुरुवारी पहाटेपासून परभणी शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णांत मोठी वाढ झाली आहे. आरटीपीसीआर चाचणीतून दररोज शेकडो रुग्ण आढळून येत आहेत. वाढत असलेल्या रुग्ण संख्येस कुठेतरी रोख बसावा, कोरोनाची साखळी तुटावी या उद्देशाने उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी सात पासून ते एक एप्रिलच्या सकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार गुरुवारी सकाळपासूनच शहरासह जिल्ह्यात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. शहरातील बाजारपेठेसह छोटी-मोठी सर्वच दुकाने बंद होती.हॉटेलधारकांनीही केवळ पार्सल देता येईल, एवढेच आपले हॉटेल सुरू ठेवल्याचे दिसून आले. पानटपरी, चहाचेहॉटेल आदी तर मागील आठ दिवसांपासून बंदच आहेत.

या शिवाय एसटी महामंडळाची सेवाही ठप्प असल्याने महामार्ग म्हणून ओळखल्या जाणार्‍या वसमत रस्त्यावर मोठा शुकशुकाट दिसून आला. परभणी बसस्थानकातही कोणीच नव्हते. एकूणच संचारबंदीस नागरिकांनी मोठा पाठिंबा दिला असल्याचे दिसून आले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.