औरंगाबादेत आता रात्री ८ वाजेपासुन संचारबंदी..!

अंशत: लॉकडाउनचे निर्बंध दिवसेंदिवस कडक

औरंगाबादेत आता रात्री ८ वाजेपासुन संचारबंदी..!

सुमित दंडुके/औरंगाबाद : शहरात वाढती कोरोना रुग्णसंख्या प्रशासनासाठी डोकेदुखी बनत आहे. या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. तसेच अंशत: लॉकडाऊन दि.४ एप्रिल पर्यंत जिल्ह्यात लागू करण्यात आलेले आहे. यामध्ये रात्री ९ वाजेनंतर जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व बाबींवर निर्बंध घालण्यात आलेले होते. आता ह्याच रात्र संचारबंदीच्या नियमांमध्ये प्रशासनाने बदल केले आहेत.

दि.१९ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत रात्री ८ वाजेनंतर पहाटे ५ वाजेपर्यंत ही रात्र संचारबंदी लागु असणार आहे. यामुळे आता जिल्ह्यातील संपुर्ण मार्केट हे रात्री ८ नंतर पुर्णपणे बंद करावे लागणार आहे. यामधुन जीवनावश्यक बाबींना वगळण्यात आले आहे.

संचारबंदीत काय राहील सुरु :

  • वैद्यकीय सेवा
  • वृत्तपत्र, मिडीया
  • दुध विक्री व पुरवठा
  • पेट्रोल पंप, गॅस एजन्सी
  • सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा (खाजगी व शासकीय) रिक्षासह
  • बांधकामे
  • उद्योग व कारखाने
  • बॅंक व पोस्ट सेवा

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.