परभणी जिल्ह्यात आता सोमवारपर्यंत संचारबंदी

जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश

परभणी जिल्ह्यात आता सोमवारपर्यंत संचारबंदी

परभणी: कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखावा म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संचारबंदीच्या कालावधीमध्ये वाढ केली असून सोमवार, ५ एप्रिलपर्यंत सकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी कायम असणार असल्याचे आज दुपारी काढलेल्या आदेशात त्यांनी नमूद केले आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. कोरोनाची ती साखळी तुटावी म्हणून उपाययोजनांचा एक भाग म्हणून गुरुवार, १ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत यापुर्वी संचारबंदी लागू केली होती. मात्र, रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने संचारबंदी कालावधीत त्यांनी वाढ केली असून ती सोमवार, ५ एप्रिल सकाळी ६ वाजेपर्यंत असणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, ज्या बाबींना, अस्थापनांना, अत्यावश्यक बाबींना या कार्यालयाने सूट दिली आहे, त्या अस्थापना सुरू राहतील, ज्या अस्थापना, दुकान यांना सूट दिली नाही ती बंद राहतील. तसेच यापुर्वी कार्यालयाने वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश, सुधारित आदेश, निर्देश या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात अंमलात राहतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.