परभणीत मध्यरात्रीपासून संचारबंदी

जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश

परभणीत मध्यरात्रीपासून संचारबंदी

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील नागरी क्षेत्रात आज मध्यरात्री १२ वाजल्यापासुन ते दि.१५ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे.

संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज दुपारी काढले. मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच बाजारपेठ, दुकाने व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिक कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पुन्हा जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढणार नाही, याबाबत खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी संचारबंदी आदेश लागू केले आहेत.

संचार बंदी संर्दभात काढले परिपत्रक

त्यानुसार परभणी महानगरपालिका हद्द आणि लगतचा पाच किलोमीटर परिसर तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगरपंचायत हद्दीमध्ये व त्यालगतच्या तीन किमी परिसरामध्ये दिनांक १२ मार्च मध्यरात्रीपासून १५ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीतून अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. सर्व शासकीय कार्यालये, त्यांचे कर्मचारी, त्यांची वाहने सर्व शासकीय वाहने, शासकीय व खाजगी दवाखाने, औषधी दुकाने, वैद्यकीय कर्मचारी, रुग्णालयातील कर्मचारी, लसीकरण केंद्र, आरटीपीसीआर चाचणी केंद्र, वैद्यकीय आपत्काल व त्या संबंधित सेवा, अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी घेतलेली वाहने, पत्रकार, दूध विक्रेते, पेट्रोल पंप, गॅस वितरक कर्मचारी व त्यांची वाहने, परीक्षेस जाणारे विद्यार्थी तसेच महाविद्यालयाचे शिक्षक कर्मचारी, परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाच्या बसेस यांना सूट देण्यात आली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.