परभणीत संचारबंदी, व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद

रस्त्यांवर तुरळीक वाहतुक मात्र सुरु

परभणीत संचारबंदी, व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद

परभणी : मागील काही दिवसात कारोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दोन दिवस संचारबंदीचे आदेश काढले. पहिल्या दिवशी शनिवार, १३ मार्च रोजी व्यापार्‍यांनी व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. तर दिवसभरात शहरातील रस्त्यांवर मात्र तुरळक वाहतुक सुरुच असल्याचे दिसून आले.

प्रशासनाने शनिवार आणि रविवार अशी २ दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीला सुरूवात झाल्यानंतर शनिवारी सकाळपासूनच रस्त्यावर किरकोळ वाहतूक सुरू असल्याचे पहायला मिळाले. तर व्यापार्‍यांनी मात्र आपली दुकाने बंदच ठेवली. यामुळे रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र दिसून आले. परभणी जिल्ह्यासह शहर महापालिकेच्या ५ किलोमीटर हद्दीत तसेच जिल्ह्यातील अन्य ८ नगरपालिकांच्या ३ किलोमीटर परिसरात ही संचारबंदी लागू केली आहे. ३१ मार्चपर्यंत संचारबंदी राहणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी अनेक बाबींवर प्रतिबंध लावले आहेत. यात धार्मिक स्थळे बंद करण्यात आली असून काही काळ विदर्भातील वाहतूकही बंद करण्यात आली होती. शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शिवाय शहरातील लग्नकार्य, मोर्चे, निदर्शने आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांवरही ३१ मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, शनिवारी दिवसभर रस्त्यांवरील तुरळक वाहतुकीसह बसस्थानक व रेल्वे स्थानकावरही प्रवाशांची वर्दळ होती. विशेषत: बसस्थानकात बाहेरगावाहून आलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्याही थांबत होत्या. यातील प्रवाशी उतरत असल्याने वर्दळ वाढली होती. यावेळी बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना सोडण्यासाठी अ‍ॅटोचालकही स्थानकाबाहेर उभे असल्याचे दिसून आले. तसेच वसमत रोड, जिंतूर रोड व गंगाखेड रोडवरील कॉलन्यामध्येही लोक रस्त्यावर आलेले दिसत होते. मुख्य बाजारपेठेतही वाहनांची तुरळक गर्दी दिसून आली. गांधी पार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक, विसावा कॅफे, नानलपेठ, स्टेशनरोड हा मुख्य बाजारपेठेचा भाग पूर्णत: कडकडीत बंद होता. यासह वसमत रोड, जिंतूर रोड, गंगाखेड रोडसह सर्वच छोटी-मोठी प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.