चक्रीवादळामुळे मुंबईत समुद्र खवळला,ऑरेंज अलर्ट जारी

वादळी वाऱ्यासह अवघ्या दोन तासात १३२ झाडे कोसळली

चक्रीवादळामुळे मुंबईत समुद्र खवळला,ऑरेंज अलर्ट जारी

मुंबईः चक्रीवादळामुळे मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.वादळी वाऱ्यासह अवघ्या दोन तासात १३२ झाडे कोसळल्याची माहितीही देण्यात आली आहे. त्यावरून तौक्ते वादळाचा तडाखा किती मोठा आहे हे दिसून येते.

समुद्र खवळला असून मोठ्या लाटा समुद्रात उसळल्या आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परिसरात लावलेले बॅरिगेट्सही पडले आहेत. तर अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत.

रेल्वे वाहतुक बंद

चक्रीवादळाचा फटका मध्य रेल्वेलाही बसल्याचे पाहायला मिळत आहे. घाटकोपर-विक्रोळी दरम्यान ओव्हरहेड वायर वरती झाडाची फांदी तुटून पडल्यानंतर स्लो ट्रॅकवरील वाहतूक ठप्प झाली आहे. जवळपास एक तासाहून अधिक वेळ प्रवासी ट्रेनमध्ये अडकलेत. ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या स्लो ट्रॅकवरील सर्व वाहतूक फास्ट ट्रॅक वरती वळविण्यात आली आहे. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत

हवाईवाहतुक बंद

तोक्ते चक्रीवादळ मुंबईच्या दिशने वाटचाल करत आहे. मुंबईत सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सोसाट्याचा वाराही सुटला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळ तीन तासांसाठी म्हणजेच, ११ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

सी-लिंक बंद

मुंबईत जोराचे वारे वाहत असून पाऊसही पडत आहे. मुंबईच्या अरबी समुद्रातून हे वादळ गुजरातच्या दिशेने जाणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वरळी-वांद्रे सी-लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून हा सी-लिंक बंद करण्यात आला आहे.

तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईला कोणताही धोका नसला तरी हवामान विभागाे मुंबई व परिसराला ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईला वादळाचा धोका नसला तरी हे चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने त्याच्या प्रभावाने मुंबईत पाऊस होण्यासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अॅलर्ट व तर, रायगडला रेड अलर्ट देण्यात आला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.