सिलिंडर स्वस्त..! व्यावसायिकांना दिलासा, घरगुती सिलिंडर मात्र महागच

आजपासून देशभरात व्यावसायिक वापराचा गॅस सिलिंडर १२२ रुपयांनी स्वस्त झाला आहे तर घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमती जैसे थेच आहेत.

सिलिंडर स्वस्त..! व्यावसायिकांना दिलासा, घरगुती सिलिंडर मात्र महागच

दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांनी आज छोटे व्यावसायिक आणि वाणिज्य ग्राहकांना दिलासा दिला आहे. आजपासून १९ किलोग्रॅमच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत १०० ते १२२ रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर घरगुती वापराच्या १४.२ किलोग्रॅम एलपीजी गॅस सिलिंडरचे दर मात्र जैसे थेच ठेवण्यात आले आहेत. या निर्णयामुळे व्यावसायिक जरी खुष असले तरी देशातील कोट्यवधी गृहिणी मात्र असमाधानीच आहे.

आजच्या दर कपातीनंतर मुंबईत १९ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलिंडरचा भाव १४२२.५० रुपये झाला आहे. दिल्लीत या सिलिंडरसाठी ग्राहकांना १४७३.५० रुपये मोजावे लागतील. कोलकात्यात तो १५४४.५० रुपये झाला आहे. तर चेन्नईत १६०३ रुपयांना १९ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलिंडर मिळेल. घरगुती वापराच्या १४.२ किलो ग्रॅमच्या गॅस सिलींडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या काही महिन्यांत सहा वेळा सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. १ जानेवारी २०२१ रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ६९४ रुपये प्रति सिलिंडर होती. १ मार्च २०२१ पर्यंत ही किंमत ८१९ वर पोहचली होती. एप्रिल महिन्यात त्यात १० रुपयांची कपात करण्यात आली होती. मे महिन्यात सिलिंडरचा भाव ८१० रुपये इतका होता.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.