पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मान्य, दादा भुसे कृषीमंत्रीपद सोडण्यास तयार

1 min read

पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मान्य, दादा भुसे कृषीमंत्रीपद सोडण्यास तयार

‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वाधिकार आहेत. ते जो निर्णय घेतील, जो आदेश देतील त्याचे पालन करणे हे शिवसैनिकाचे काम आहे आणि दादा भूसे एक शिवसैनिक आहे’

मुंबई : मंत्रिमंडळात फेरबदल करुन शिवसेनेच्या कोट्यातील कृषीमंत्रीपद खडसेंना दिलं जाणार अशी चर्चा सुरु आहे.एकनाथ खडसे यांनी भाजपला राम-राम ठोकल्यानंतर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याचा बातम्या समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आपण कृषीमंत्रीपद सोडण्यास तयार आहोत. पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय आपल्याला मान्य आहे, ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वाधिकार आहेत. ते जो निर्णय घेतील, जो आदेश देतील त्याचे पालन करणे हे शिवसैनिकाचे काम आहे आणि दादा भूसे एक शिवसैनिक आहे’, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

एकनाथ खडसे यांचा थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खडसेंना मंत्रिमंडळात स्थान द्यायचं की नियोजन मंडळावर त्यांची वर्णी लावायची, याबाबत महाविकास आघाडीत संभ्रम असल्याचं पाहायला मिळतंय. कारण, शिवसेना कृषीमंत्रीपद सोडण्यास तयार नसल्याची माहिती मिळतेय. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाडही आपल्याकडील गृहनिर्माण खातं खडसेंना देण्यास तयार नसल्याचं कळतंय. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.