पाठीत खंजीर

शरद पवार - भाग २ शरद पवार वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि "पाठीत खंजीर खुपसणे" हा शब्द शरद पवारांसाठीच लागू झाला.

पाठीत खंजीर

महाराष्ट्रः १९६६ साली शरद पवारांना बारामती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणुन निवडणुक लढवण्याची संधी मिळाली. यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या काळात बारामती विधानसभा मतदारसंघातुन स्थानिक उमेदवार निवडुन येत नव्हता. बाहेरुन उमेदवार बोलवले जायचे आणि निवडणुक लढवली जायची. बारामतीच्या काँग्रेसचा पवारांना तिकीट देण्यास विरोध होता, कारण शरद पवार वयाने लहान होते आणि त्यांना तिकीट दिलं तर आमच्या सगळ्यांच राजकारणातील भवितव्यच संपुष्टात येईल असं पक्षातील इतर नेत्यांना वाटत होतं. अगदी तसंच बारामतीमध्ये घडलं. १९६६ पासून ते आता २०२१ पर्यंत बारामतीच्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघावर आपली पकड इतकी घट्ट बसवली आहे, की बारामतीला पवारांशिवाय अन्य कोणीही निवडून येत नाही. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे आलटुन पालटुन बारामती मतदारसंघातुन आमदार, खासदार म्हणून निवडुन आले आहेत.

बारामतीचं राजकारण पवारांच्या घराभोवती फिरत राहिलं, इतकंच नाही तर आजुबाजुच्या मतदार संघातही पवारांनी आपलं जाळं पसरायला सुरुवात केली. कर्जत जामखेडलाही पवारांची तिसरी पिढी आपला अधिकार गाजवु लागली आहे, पार्थ पवारांनाही मावळ मतदारसंघातुन उमेदवारी देण्यात आली होती मात्र त्यांना पराभूत व्हावं लागलं. आतापर्यंत जी भिती काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी व्यक्त केली होती ती सत्यात उतरली आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांची कारकिर्द संपुष्टात आली. यशवंतरावांच्या वरदहस्तातुन बारामतीतली काँग्रेस संपुष्टात आली, कारण पुढे दोन वेळा पवारांनी काँग्रेसचा त्याग केला. काँग्रेसमध्ये असताना किंवा नसताना, बारामती मतदार संघात पवारांची पकड मजबूत झाली. त्या मतदारसंघात १९६६ साली विजयी झालेल्या पवारांचा पुन्हा कधीच पराभव झाला नाही. त्यांच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या सोबत असणा-या प्रत्येक राजकारण्याला एकदातरी पराभवाचा धक्का बसलेला आहे. अगदी सुशील कुमार शिंदे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, शिवराज पाटिल चाकुरकर आणि अगदी अटल बिहारी वाजपेयींनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

१९६७ साली पवार विवाहबद्ध झाले. पुढे पवारांच राजकारण रंगतदार स्थितीत जाऊ लागलं. १९७१ ला बांग्लादेशचं युद्ध झालं होतं, इंदिरा गांधींनी त्यात मोठा पराक्रम दाखवला होता. या युद्धानंतर 'आयर्न लेडी' अशी त्यांची प्रतिमा झाली होती. अगदी अटल बिहारी वाजपेयींनीही "दुर्गा" असं नाव त्यांना दिलं होतं, देशभरात इंदिरा नावाची लाट होती. या लाटेचा फायदा महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीतही झाला. २७५ पैकी २२२ जागा एकट्या काँग्रेसने जिंकल्या होत्या, विरोधी पक्ष जवळपास नामशेष झाला होता. पवारही या काळात निवडुन आले आणि पहिल्यांदा त्यांना मंत्री म्हणुन काम करण्याची संधी मिळाली. पुढे पवारांची प्रगती झाली आणि राज्यमंत्रीपद त्यांना मिळालं, त्यानंतर कॅबीनेट मंत्रीपद मिळालं. पवार आपल्या राजकीय ताकदिला वाढवु लागले होते. त्यावेळी देशामध्ये एक नवा बदल झाला. देशात आणीबाणी लागु झाली आणि त्यानंतर इंदिरा गांधींनाही पराभव स्विकारावा लागला होता. याच काळात महाराष्ट्रात पुलोदचा प्रयोग होत होता. इंदिरा गांधींनी "इंदिरा काँग्रेस" नावाचा नवा पक्ष स्थापन केला आणि महाराष्ट्रात पवारांनी काँग्रेसची साथ सोडली.

त्यावेळी वसंतदादा पाटील निवडणुकीमध्ये बहुमत घेऊन निवडुन आले. काँग्रेस एस आणि इंदिरा काँग्रेस या दोन्हीचं एकत्रीकरण होतं. नासिकराव तिरपुडे तेव्हा उपमुख्यमंत्री होते आणि ते वारंवार सरकारला कमी लेखत असत. हे सरकार पडणार असं सगळ्यांना वाटत होतं, वर्तमानपत्रांनीही तशा पद्धतीच्या बातम्या छापायला सुरुवात केली. या काळात पवारांनी ३८ आमदारांची जुळवाजुळव केली. वसंतदादांच सरकार पाडण्यासाठी हे प्रयत्न चालू होते आणि पवारांनी आपल्या रामटेकच्या निवासस्थानी बैठका घेण्यास सुरुवात केली. याच बैठकांच्या दरम्यान यशवंतरावांनी शरद पवारांना सरकार न पाडण्यासाठी आणि शांत राहण्याचा निरोप पाठवला. परंतु पवारांनी राजीनामे पाठवले आहेत असं सांगितलं आणि वसंतदादांच सरकार पडलं. चंद्रशेखरांच्या मदतीने जनता पक्षाच्या जोरावर पवारांनी राजकारणात नव्याने पाऊल टाकलं आणि पवार पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

शरद पवार वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि "पाठीत खंजीर खुपसणे" हा शब्द शरद पवारांसाठीच लागू झाला. शरद पवारांच हे सरकार अत्यंत अल्पजीवी ठरलं कारण पुन्हा मोठं स्थित्यंतर झालं. इंदिरा गांधींच्या जनत पक्षाचं पतन झालं, त्या काळात शरद पवारांनी यशवंतरावांसाठी अनेक प्रयत्न केले होते. मोरारजी देसाईंच सरकार पडल्यावर आपलं सरकार यावं म्हणून यशवंतरावांनी प्रयत्न केले होते, त्यासाठी राष्ट्रपतींना कशा पद्धतीने पटवण्यात आलं होतं. पण इंदिरा गांधी जनता पक्षाच्या सरकारनंतर पुन्हा एकदा सत्तेवर आल्या. इंदिरा काँग्रेस मोठ्या प्रमाणात समोर आलं आणि आल्याबरोबर इंदिरा गांधींनी शरद पवारांच सरकार पाडलं. तरीही शरद पवार विरोधी पक्षात राहिले, काँग्रेसमध्ये गेले नाही. पवार ज्यांना गुरु म्हणायचे ते यशवंतरावही काँग्रेसमध्ये गेले पण पवार गेले नाही. यावरुनच ते यशवंतरावांच्या सोबत होते की नाही हे आपल्या लक्षात येईल.

पवारांची खरोखर ताकद होती तर पुढे १९८० साली झालेल्या निवडणुकांमध्ये पवारांना चांगली मतं, चांगल्या जागा मिळणं अपेक्षित होतं. पण या निवडणुकीत पवारांच्या काँग्रेस एस पक्षाला तीन अंंकी संख्या गाठता आली नाही, ५० च्या खाली पवार सीमित राहीले. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आणि काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर आला. ही सत्ता काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची होती. या काळात शरद पवार विरोधीपक्षनेते म्हणून विरोधी पक्षात बसले होते, परंतु पवार अस्वस्थ होते आणि ही अस्वस्थता पवारांनी पुढे दूर केली. ही संपूर्ण परिस्थिती पाहिली तर शरद पवार लोकनेते म्हणून नाही तर एक उपद्रवी नेते म्हणून, पाठीत खंजीर खुपसणारे नेते म्हणून त्यांची राजकीय कारकिर्द सुरु झाली होती.

  • सुशील कुलकर्णी

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.