पावसामुळे मिरची पिकांचे नुकसान; भाजीपाल्यांचे भाव गगनाला

1 min read

पावसामुळे मिरची पिकांचे नुकसान; भाजीपाल्यांचे भाव गगनाला

राज्यात मिरचीचे हब म्हणून ओळखले जाणा-या सिल्लोड तालुक्यात मिरची पिकावर मोठा परिणाम झाला आहे.

सुमित दंडुके/औरंगाबाद- यंदा सिल्लोड शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे तालुक्यातील बहुतांश पिके वाया गेले आहेत. राज्यात मिरचीचे हब म्हणून ओळखले जाणा-या सिल्लोड तालुक्यात मिरची पिकावर मोठा परिणाम झाला आहे. बाजारात मिरची आता भाव खाऊ लागली आहे. राज्यातील मोठ्या शहरात तालुक्यातून मिरची विक्रीस जाते, मात्र यंदा लॉकडाऊन व जोरदार पाऊसामुळे मिरची पिकावर परिणाम झाला आहे. पावसामुळे मिरचीसह अन्य भाजीपाल्यांचे भाव देखील वाढले आहेत. त्यामुळेच सामान्य नागरिकांच्या खिशाला याची झळ लागत आहे.