दानवे म्हणतात मोदी "बैल"

रावसाहेब दानवे कायमच आपल्या विधानांसाठी चर्चेत असतात. अशाच एका विधानाचा खुलासा करताना ते चक्क मोदींनाच "बैल म्हणाले."

दानवे म्हणतात मोदी "बैल"

महाराष्ट्रः भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री, ज्यांची नुकतीच रेल्वे आणि कोळसा मंत्रालयात बदली झाली ते  रावसाहेब दानवे यांनी आपल्या मतदारसंघात येताच बोलायला सुरुवात केली. त्यांची जिभ म्हणजे घसरगुंडीच आहे ती अनेकदा घसरते. असंच एक विधान त्यांनी आता पुन्हा केलं आहे. ते म्हणाले, राहुल गांधी "सांड" आहेत. आता राहुल गांधींना दानवेंनी काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे पण त्याचा खुलासा देताना दानवे वेगळंच काहीतरी बोलुन बसले. ते म्हणाले, "दोन प्रकारचे बैल असतात, एक म्हणजे काम करणारा आणि एक काम न करणारा" काम न करणारा सांड म्हणजे राहुल गांधी आणि काम करणारा बैल म्हणजे नरेंद्र मोदी.

नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळातला एक मंत्री ज्याचं केंद्रीय स्तरावरील नेतृत्त्व स्विकारलं गेलं आहे. असा व्यक्ति गंमत करताना आपल्याच पंतप्रधानांना बैल म्हणून टाकतो. हे कसं घडु शकतं? रावसाहेब दानवे ग्रामीण भाषा बोलतात हे मान्य आहेत पण असं बोलताना आपल्याच नेत्याला बैलाची उपधी देऊन टाकणं हे जरा आश्चर्यकारक आहे. नरेंद्र मोदी नक्कीच बैलबुद्धी नाहीत, ते या देशाचे नेते आहेत. या देशाला चालवणारा व्यक्ति सारथी असु शकतो, बैल नाही. पण वक्तव्य किंवा खुलासा करतानाही चुका करणारे रावसाहेब दानवे यांच्या मनात मोदींविषयी काय भावना आहेत हे यावरुन स्पष्ट होतं. गोमांसाच्या प्रकरणातही भाजपच्या भुमिके विरोधात रावसाहेब दानवे बोलतात तरीही त्यांना पदोन्नती दिली जाते, हे आश्चर्यकारक आहे.

रावसाहेब दानवे नेहमीच काहीतरी बरळत असतात. ते ग्रामीण नेते आहेत, त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे परंतु जेव्हा जबाबदारीचं पद एखाद्या नेत्याला दिलं जातं तेव्हा त्याने अधिक जबाबदारीने बोलणं अपेक्षित असतं. पण तसं होताना दिसत नाही, एकदा तर, 'दिल्लीत सोनिया गांधींच स्मृतीस्थळ आहे' असं ते म्हणाले होते, त्यांना इंदिरा गांधी म्हणायचं होतं. आपल्या या चुकांबाबत ते माफीही मागत नाहीत उलट विषय तसाच रेटुन नेतात. राबसाहेब दानवे अजाणतेपणातुन या चुका करतात की जाणतेपणातुन, केवळ लोकांमध्ये चर्चेत रहावं म्हणून बोलतात हे अद्याप उघड झालेलं नाही.

  • सुशील कुलकर्णी

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.