सिध्देश्वर गिरी/परभणी: परभणी जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांच्या बदलीनंतर जिल्ह्यातील प्रशासनात ढिसाळ नियोजन व लाच घेण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.परभणी जिल्हा म्हणजे जगात जर्मनी आणि भारतात परभणी ही म्हण येथील कामचुकार अधिकाऱ्यांनी अंमलात आणली आहे.
मागील अनेक दिवसापूर्वी स्वाती सूर्यवंशी यांनी दोनवेळा लाच घेतल्याचे प्रकरण असतानाच. नुकतीच त्यांनी गंगाखेड येथील नगरपालिकेच्या कामासाठी देण्यात येणाऱ्या निधीतून मोठ्या लाचेची मागणी केली होती.लाच घेताना त्यांचे सहाय्यक कर्मचारी यांच्यासह दोघांना अटक करण्यात आले आहे. प्रशासनाला लाजवेल अशाप्रकारे वर्तन श्रीमती सूर्यवंशी यांनी केलेले आहे. दरम्यान कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर कडक संचारबंदीच्या दरम्यानही श्रीमती सूर्यवंशी यांनी दलालांमार्फत प्रवासी पास देऊन आर्थिक कमाई केल्याची चर्चा होत आहे.
त्याचबरोबर जिल्ह्यातील वाळू माफियासोबत आर्थिक हितसंबंध जोपासून कामे मार्गी लावल्याची चर्चा होत आहे. निवासी उपजिल्हाधिकारी या पदाचा पदभार मिळाल्यापासून सूर्यवंशी यांनी आपले बस्तान वाढवले होते. त्यांची सखोल चौकशी करून त्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान परभणी प्रशासनातला अंधार दूर करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.सदर कार्यवाहीत उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी,अभियंता हमीक अब्दूल खय्युम तसेच अव्वल कारकुन श्रीकांत करभाजने या तिघांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांसह कर्मचार्यांच्या पथकाने साडेचार लाख रुपयांची लाच घेतल्याबद्दल मंगळवारी (दि.8) दुपारी ताब्यात घेतले.
गंगाखेड येथील नगरपालिकेअंतर्गत विकासकामांच्या प्रशासकीय मान्यतेकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत नगर परिषद विभागाने संबंधित नगरसेवकाच्या वतीने साडेचारलाख रुपयांची लाच मागीतली. तेव्हा संबंधितांनी तात्काळ लाचलूचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दाखल केली. या खात्याच्या पथकाने सोमवारी (दि.7) पंचांसमक्ष पडताळणी केली. तेव्हा नगरपालिका प्रशासन विभागातील अव्वल कारकुन श्रीकांत विलासराम करभाजने,अभियंता अब्दूल हकीम अब्दूल खय्युम यांनी तक्रारकर्त्याकडून दीड टक्केप्रमाणे म्हणजे अंदाजे साडेचार लाख रुपये पंचासमक्ष मागणी केली. त्यास निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती वसंतराव सूर्यवंशी यांनी पंचासमक्ष संमती दर्शवली.त्याआधारे या खात्याच्या पथकाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा रचला. अव्वलकारकुन श्रीकांत करभाजन यांनी तक्रारकर्त्यास अब्दूल हकीम अब्दूल खय्युम यांना पैसे द्यावेत असे नमुद केले. संबंधितांकडून पंचासमक्ष खय्युम यांनी ती लाच स्वीकारली. पाठोपाठ या पथकाने त्या दोघांना रकमेसह ताब्यात घेतले. आणि तीनही आरोपीस स्वीकारलेल्या रकमेसह ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली.
या कारवाईत या विभागाच्या पोलिस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर,अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक भरत हुंबे,पोलिस निरीक्षक अतुल कडू,जमीलोद्दीन जागीरदार, शेख शकील,अनिल कटारे,माणिक चट्टे,अनिरूध्द कुलकर्णी,सचिन धबडगे,शेख मुखीद,सारिका टेहरे,मुक्तार,जनार्धन कदम,रमेश चौधरी यांनी ही कारवाई यशस्वी केली.
परभणी प्रशासनात अंधार! साडेचार लाखांची लाच घेताना निवासी उपजिल्हाधिका-यासह तिघे ताब्यात.
लाचलूचपत प्रतिबंधक खात्याची कारवाई. निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशीसह तिघे साडेचार लाखाची लाच घेतांना रंगेहात पकडले. वरिष्ठ लक्ष देतील काय?

Loading...