दशनाम युवक प्रतिष्ठाणच्या परभणी जिल्हा कार्यकारिणीच्या नियुक्त्या जाहीर

1 min read

दशनाम युवक प्रतिष्ठाणच्या परभणी जिल्हा कार्यकारिणीच्या नियुक्त्या जाहीर

प्रतिष्ठाणच्या बैठकीत निर्णय

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: दशनाम युवक प्रतिष्ठाणच्या जिल्हा पदाधिकारी यांच्या नियुक्त्या नुकत्याच परभणीचे संस्थापक अध्यक्ष संदीप गिरी कान्हेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. याबाबत प्रतिष्ठाणची महत्वपुर्ण बैठक परभणी येथे दशनाम युवक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष स्वप्नील गोविंदराव भारती यांच्या निवासस्थानी पार पडली. सदर बैठकीमध्ये प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष,सचिव,कोषाध्यक्ष सदस्य हे सर्व उपस्थित होते. दशनाम युवक प्रतिष्ठाणच्या सदस्यांची नुतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली.या कार्यकारिणीमध्ये उपजिल्हाध्यक्ष म्हणुन पवन रतन पुरी,संतोष केशवराव पुरी,सहसचिव म्हणुन वैजनाथ प्रभु गिरी सर,आणि अशोक नरसिंग पुरी तर जिल्हा प्रवक्ता म्हणुन महेश शिवाजी पुरी,प्रसिध्दीप्रमुख गजानन देवगिर गिरी,अनुरथ घनश्याम भारती,प्रिंट मिडिया प्रसिध्दीप्रमुख म्हणुन सिध्देश्वर केशवबुवा गिरी,जिल्हासंघटक म्हणून दिलीप माणिकराव गिरी,रमेश विश्वनाथ भारती,निलेश नारायण गिरी यांची निवड करण्यात आली आहे.तर सदस्य म्हणुन प्रविण गिरी,राजाराम श्रीराम पुरी,सतिश प्रताप भारती,अवधुत विठ्ठल गिरी,मुरली डिगांबर पुरी,सोमेश्वर विष्णु गिरी यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.
दशनाम युवक प्रतिष्ठाण परभणीने आजपर्यंत अनेक सामाजिक,धार्मिक,आर्थिक उपक्रम राबविले आहेत.याअंतर्गत बचत गटांची स्थापना करुन समाजातील गरजूंना अर्थिक मदत उपलब्ध करुन दिलेली आहे.सामाजिक उपक्रमातंर्गत रक्तदान शिबिर घेणे.गंगाखेड गोसावी समाज समाधी धामाचा प्रश्न हाती घेउन तो सर्वांच्या सहकार्यातुन प्रश्न सोडविला आहे.एक सामाजिक उपक्रम म्हणून समाजातील गुणवंत विद्यार्थी व इतर क्षेत्रामध्ये नियुक्ती,निवड झालेल्या बांधवांचा,भगिणींचा सन्मान,सत्कार सोहळा सध्या प्रतिष्ठाणच्या वतीने चालु आहे.धार्मिक, आध्यात्मिक उपक्रमा अंतर्गत विविध प्रवचनमाला,किर्तनमाला,व्याख्यानमाला हे उपक्रम लॉकडाउन कालावधीमध्ये राबविलेले आहेत.