कर्जबाजारी तरूण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या…

प्रशासकीय लेवलवर बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

कर्जबाजारी तरूण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या…

माधव पिटले/निलंगा: कर्जबाजरी पणाला व सततच्या लाॕकडाऊनला कंटाळून एका तरूण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील निरंजन राघू (वय 36 वर्ष), यानी स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळ्यातील गमच्याने दिनांक २४ रोजी पहाटे ५ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली असून याबाबत निलंगा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदरील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे प्रेत उत्तरिय तपासणी करून अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसापूर्वीच तालुक्यातील अंबुलगा बु येथील एका ट्रक चालकाने लाॕकडाऊनला कंटाळून आत्महत्या केली होती. अनेक लोकांना आपला संसार कसा चालवावा हा प्रश्न पडला असून प्रशासकीय लेवलवर बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.